भुईमुग पिकाचे नियोजन उदासी तंत्र

भुईमुग हे बहुपयोगी पिक महाराष्ट्रात अनेक भागात घेतले जाते. खाद्यतेल देणारे

हे पिक जनावंरासाठी उत्तम पेंड सुध्दा देते. खरीप, रव्बी व उन्हाळयात सुध्दा हे पिक

घेता येते.

भुईमुगा वरील किड व रोग व्यवस्थित पणे नियंत्रणात ठेवल्यास हमखास

उत्पादन चांगले घेता येते.

भुईमुगावरिल किड :

मावा, तुडतुडे, फुल किडे, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, हुमणी.

भुईमुगावरिल रोग :– पानावरील ठिंबके (टिक्का), तांबेरा कळी, करपा, मर किंवा मुळकुज. माझ्या तंत्रामध्ये वरिल किडींचा व रोगांचा बंदोबस्त फवारण्यामधून करण्याचा प्रयत्न केला आहे.

पाऊस पडण्याचा कालावधी कमी असलेल्या भागात जसे पाऊस जुन जुलै मध्ये सुरू होवुन सप्टेंबर अखेर बंद होत असल्यास अशा भागात कमी कालावधीचे वाण ९० ते १२० दिवसाचे उपटया जातीचे बियाणे निवडतात व जुन महिन्यापासुन नोव्हेंबर अखेर पर्यंत ज्या भागात पाउस चालु असतो.

अशा भागात १२० ते १५० दिवसात तयार होणारे वाण पसऱ्या व निमपसऱ्या जातीचे घेतल्या जातात.

* जमिनीची मशागत :-

हलकी ते मध्यम व पाण्याचा निचरा होणारी जमिन जी भुसभुशीत असणे आवश्यक आहे. चिबाड अथवा चोपन जमिनीत भुईमुग लागवड करु नये.

सखोल नांगरट करुन सिंगल सुपर फॉस्फेट-१ बॅग व फोरेट अथवा थिमेट-६ किलो प्रति एकरी शिंपुन कुळवाच्या २ ते ३ पाळया देवुन जमिन भुसभुशीत करावी.

तयार केलेले शेणखत असल्यास घ्यावे. सपाटीकरण केलेल्या जमिनीवर पाणी देण्यासाठी २ ते ४ मिटर रुंदीचे सारे तयार करावेत.

बियाणे निवड प्रक्रिया :

उन्हाळी लागवड करावयाची असल्यास एसबी ११, टी.जी. १७,टी.एजी. २४, आय. सी.जी.एस. ११, एम १३ तर खरीपा करिता बी.९५, फुले प्रगती, टी.एम.व्ही. १० हे वाण निवडावे. बाजरात सुध्दा संकरित व सुधारित बरेच वाण उपलब्ध असतात.

उन्हाळी भुईमुग लागवड करतांना पाण्याचे नियोजन आपल्याकडे व्यवस्थित आहे काय याचा विचार करावा.

बियाणे प्रक्रिया :

प्रति एकरी ४० किलो बियाणे घेवुन त्यास बिज प्रक्रिया करावी. युमिक जेल – १२५ ग्रॅम, बावीस्टीन – १०० ग्रॅम या दोन्ही घटाकांचे द्रावण तयार करुन विज प्रक्रिया करावी व रात्रभर वाळू द्यावे, डिसेंबर अखेर किंवा जानेवारी पहिल्या आठवड्यात पेरणी करुन मे महिन्यात पीक काढल्यावर खरीपाकरिता जमिन तयार करता येईल.

भुईमुग पेरणी :-

ओल करून वाफसा झाल्यावर पाभरीच्या साहायाने अथवा टोकन पध्दतीने पेरणी करावी.

साधारणतः दोन ओळीतील अंतर १२ इंच (१ फुट) दोन रोपातील अंतर ६ इंच ठेवावे.

पसऱ्या जातीसाठी दोन ओळीतील अंतर दिड फुटाचे ठेवावे. बियाणे २ ते ३ इंच खोल ओल्या मातीत पेरावे.

पेरणी टोकन पध्दतीने केल्यास एका ठिकाणी दोन (२) बिया टाकाव्या. जास्त उताराच्या जमिनीवर पेरणी उताराच्या आडव्या दिशेने करावी.

उगवणीच्या काळात कावळे व इतर पक्षी बियाणे खातात या वेळेस राखण करावी व नांगे आढळून आल्यास ताबडतोब भरावे.

खताची पहिली मात्रा:-

पेरणी सोबतच खताची पहिली मात्रा द्यावी.

डी.ए.पी.- १ बॅग

युरिया -२५ किलो

पोटॅश-२५ किलो

हाय पावर-१० किलो,

शक्ति गोल्ड- १० किलो यांचे मिश्रण पेरावे.

पेरणी सोबत शक्य न झाल्यास नंतरही खत देता येते.

भुईमुगास जास्त पाणी दिले गेले तर पाने पिवळी पडतात.

अशा वेळेस पानावरील अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते तसेच लोह व जस्त कमी असल्यास पाने पिवळी पडतात.

अशा वेळेस हायपॉवर- १० किलो, युरिया – २५ किलो प्रति एकरी शिपंल्यास वरील समस्या आटोक्यात येईल.