दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Dew Point & Humidity)

  • तलाव, नदया आणि सागर यांच्यातील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात पाण्याचे बाष्प असते.
  • वातावरणात असणार्‍या पाण्याच्या वाफेचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. वातावरणामध्ये असणार्‍या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास मदत होते.
  • जव्हा हवा खूप थंड होते तेव्हा हवेत असलेली पाण्याची वाफ संतृप्त (Staturated) होते. त्यामुळे बाष्पाचे लहान थेंब बनतात.
  • जया तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास ‘दवबिंदू तापमान’ म्हणतात. हवेमध्ये असणार्‍या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते.
  • हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यालाच ‘आर्द्रता’ म्हणतात.
  • जया राशीच्या सहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे शेकडा प्रमाण मोजले जाते तिला निरपेक्ष आर्दता (Absolute Humidity) असे म्हणतात.
  • एकक आकारामानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास ‘निरपेक्ष आर्द्रता’ असे म्हणतात.
  • सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही Kg/m3मध्ये मोजतात.
  • जर हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्यात बाष्पाच्या प्रमाणापेक्षा हवेतील बाष्प खूपच कमी असेल तर ती हवा कोरडी असल्याचे आपणास जाणवते.
  • याउलट हवेतील बाष्पाचे प्रमाण ती हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्याव बाष्पाच्या प्रमाण सापेक्ष संतृप्त हवेपेक्षा किंचित कमी असेल तर हवा दमट आहे असे जाणवते.
  • हवेच्या दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्र्तेच्या रूपात मोजतात.
  • दवबिंदू तापमानास हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते.
  • जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल टीआर हवा दमट असल्याचे जाणवते. 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते.
  • थड जमीन तिच्या सान्निध्यात येणारी हवा दवबिंदू तापमानापेक्षा कमी तापमानापर्यंत थंड करते. जेव्हा हवेतील बाष्पाचे संघनन (condensation) होते तेव्हा धुके (Fog) तयार होते.
  • जव्हा गरम हवा थंड जमीन किंवा समुद्रावरून वाहते तेव्हा सुद्धा धुके तयार होते. सागरी धुके (Sea Fog) यामुळे तयार होते.