Sulphur गंधक

कार्य

1) गंधक हे प्रकाश संश्‍लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढण्यास मदत करते. त्यामुळे पिकांच्या अन्ननिर्मितीला चांगली चालना मिळते. 
2) गंधक हा प्रत्येक जिवंत पेशीचा एक भाग आहे. तसेच सिस्टीन, सिस्टाईन व मिथीनोओतीत या आवश्‍यक जमिनी आम्लांचा एक घटक आहे. 
3) गंधक हे बीजोत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत करते. त्याचबरोबरीने द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठींमध्ये वाढ करण्यास व जिवाणूद्वारे नत्र स्थिरीकरण्यात मदत करते, विविध विकार व चयापचयाच्या क्रियेला मदत करते. 
4) भुरीच्या नियंत्रणासाठी गंधकाचा 80 टक्के वेटेबल पावडर म्हणून वापर होतो, कोळीनाशक म्हणूनही त्याचा वापर होतो. 
5) गंधकामुळे हरितद्रव्य निर्मितीत आणि प्रकाश संश्‍लेषणामध्ये वाढ होते. प्रथिनांचे प्रमाण वाढते. फळांमधील विद्राव्य पदार्थांचे प्रमाण वाढते.

जमिनीत Sulphur च्या कमतरतेची कारणे

1) मातीच्या ऱ्हासामुळे आणि निचऱ्याद्वारे होणारी गंधकाची कमी. 
2) गंधकविरहित अथवा गंधकाचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या खतांचा वापर. 
3) जमिनीतून पिकांद्वारे सातत्याने, गंधकाचे होणारी उचल. 
4) शेतातील पिकांचे अवशेष, सेंद्रिय खते आणि काडी कचऱ्याचे चक्रीकरणातून होणारा कमी वापर.