कोरडवाहू साठी 25 जुलै ते 15 सप्टेंबर पर्यंत कधीही करता येते , ओलिताची व्यवस्था असेल तर ऑक्टोबरमध्ये सुद्धा करता येते, यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पेरणी झाल्या नंतर 15 दिवसात मुसळधार पाऊस चालत नाही, आणि ज्या वर्षी अवकाळी पाऊस येतात त्या वर्षी ओवा खराब होऊन जातो,
ओवा फुल अवसतेत असताना(1जानेवारी- 15 मार्च) अवकाळी पाऊस पडल्यास ओवा खराब होतो मार्केट मध्ये रेट मिळत नाहीत.
15 ऑगस्ट ला लावल्यास दोन ओळींमधले अंतर साडे तीन फूट असायला पाहिजे चांगल्या जमीनीत , हलक्या जमिनीत 3 फूट चालते
30 ऑगस्ट ला केल्यास 2 ओळींमधले अंतर 3 फूट , हलक्या जमिनीत 2.5 फूट
10 सप्टेंबर च्या आसपास लावल्यास 2 ओळींमधले अंतर 2.5 फूट ठेवावे , यापेक्षा अंतर कमी करू नये.
एकरी 1 ते 1.5 किलो बियाणे वापरावे .
पाहिले जमीन सपाट करावी नंतर साऱ्या पाडुन किंवा वारंब्या वर मजुरांच्या साहाय्याने लागवन करावी आणि उदासी सरांचे तंत्र वापरावे
ओवा तंत्र
बीज प्रक्रिया:- एकरी एक किलो ओवा घेणे
त्याला बीजप्रक्रियेसाठी हुमिक जेल आणि बाविस्टीन घेणे.
खताचा पहिला डोस:- खताचा पहिला डोस आपण दहा ते पंधरा दिवसांनी देत असतो.
२०:२०:०:१३ एक बॅग
हाय पावर १० kg
शक्ती गोल्ड १० kg
प्रथम फवारणी:- ही फवारणी आपण फळ फांद्या घेण्यासाठी आणि मुळा मजबूत होण्यासाठी घेतो.
चॅलेंजर ५ ml
ह्युमिक जेल २५ gm
रोको २० gm
द्वितीय फवारणी:- ही फवारणी आपण फुलोरा अवस्थेत असताना घेत असतो कारण त्याला जास्त फुले येण्यासाठी आपण घेत असतो.
फ्लॉवर स्ट्रोंग २५ ml
चमत्कार ५ ml
नुवान २० ml
तृतीय फवारणी:- ही फवारणी आपण माल मजबूत होण्याकरता घेत असतो.
अमिनो ऍसिड २५ gm
नुवान २० ml