गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (कालावधी ७ एप्रिल,२०२१ ते ६ एप्रिल २०२२)

महाराष्ट्र शासन- कृषी विभाग
१००% टक्के राज्य शासन अनुदानित
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
(कालावधी ७ एप्रिल,२०२१ ते ६ एप्रिल २०२२)

राज्यातील १ कोटी ५२ लाख खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचा समावेश.

पात्रता निकष- कुटुंबाच्या व्याख्येमध्ये खातेदार शेतक-याचे १० ते ७५ वर्षे वयोगटातील आई-वडिल,शेतक-याचा
पती/पत्नी,मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राहय.

विमा संरक्षण- अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना /त्यांच्या कुटुंबियांस अनुज्ञेय लाभ
अपघाती मृत्यू झाल्यास रु.२ लाख व अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या स्वरुपानुसार रु.१
ते २ लाख.
वारसदार : १) अपघातग्रस्ताची पत्नी/ पती, २) अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी .३)
अपघातग्रस्ताची आई. ४) अपघातग्रस्ताचा मुलगा. ५) अपघातग्रस्ताचे वडिल,६) अपघातग्रस्ताची
सून,७) अन्य कायदेशीर वारसदार.
विमा सल्लागार कंपनी
विमा कंपनी
ऑक्झिलियम इंश्युरंस ब्रोकिंग कं.लि.

ईमेल
gmsavy21@auxilliuminsurance.com

टोल फ्री क्र.1800 220 812

 

युनिव्हर्सल सोम्पो जनरल इंश्युरन्स कं.लि.

ई मेल

vaibhav.shirsat@universalsompo.com

टोल फ्री क्र. 180022 4030.

शेतकरी/वारसदाराने विमा सल्लागाराचे प्रतिनिधीशी संपर्क करुन प्रस्ताव तयार करावा व तालुका कृषि अधिकारी कार्यालयास
सादर करावा.