डॉ.विश्राम रामजी घोले

डॉ. विश्राम घोले (इ.स. १८३३ – इ.स. १९००) हे पुण्यातील एक निष्णात शल्यविशारद आणि उदारमतवादी समाजसुधारक होते.

स्त्री-शिक्षण, मागास जातीतील सुधारणा, शेती व उद्योग या क्षेत्रांतही डॉ. विश्राम रामजी घोले या बुद्धिमान आणि कर्तबगार व्यक्तीचे कार्य होते. १८५७ सालच्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात डॉ. घोले यांनी एक सर्जन म्हणून निःपक्षपातीपणे कामगिरी बजावली होती. नंतरच्या काळात, बिटिश अधिकारी तसेच पारशी-मारवाडी समाजातले श्रीमंत पेशंट, तत्कालीन समाजसुधारक व राजकीय चळवळीतले नेते आणि सामान्यजन अशा त्या ऐन इंग्रजी अमदानीतल्या सर्व थरांतील रुग्णांचे ते डॉकटर होते.

पुण्यात बाहुलीचा हौद म्हणून जे ठिकाण होते त्या हौदाच्या मध्यावर विश्राम रामजींची थोरली मुलगी काशीबाई ऊर्फ बाहुली हिचे शिल्प होते. वयाच्या नवव्या वर्षी, १८७७ मध्ये काशीबाई मरण पावली. तिला डॉ. घोले यांनी इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. घोले यांच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती व महिलांचा याला प्रखर विरोध होता. जातीतील प्रमुख लोकांनी घोले यांनी मुलीला शिकवू नये असा सल्ला अनेक वेळा दिला व तसे न केल्यास जातीतून बहिष्कृत करण्याची धमकीही दिली. काही नतद्रष्ट नातेवाईक व्यक्तींनी काशीबाईला काचांचा लाडू खायला घातल्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन ती मृत्युमुखी पडली.

१८७५ सालच्या दुष्काळानंतर विश्राम रामजींनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आपले लक्ष केंद्रित केले. शेतीविषयक अनेक प्रयोग त्यांनी केले. शेतकरी मासिकाच्या स्थापनेतही त्यांनी पुढाकार घेतला आणि आर्थिक कारणांमुळे हे मासिक बंद पडू नये, याची सुरुवातीच्या काळात त्यांनी काळजी घेतली.
संस्था स्थापणेत सहभाग

हुजुर पागा
डेक्कन एज्युकेशन सोसायटी
डेक्कन असोशिएशन

सीताराम गायकवाड यांनी त्यांच्या “पुणे शहर ” या पुस्तकाचा दुसरा भाग विश्राम रामजींना अर्पण केला आहे.

सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष ही होते २ वर्ष
(फुले-घोले-लाड).
विष्णुशास्त्री चिपळुनकरांच्या मृत्यु समयी डॉक्टर म्हणुन महत्वाची भुमिका बजावली होते.

व्हाइसरॉय साठी चे असिस्टंट सर्जन म्हणुन कार्यरत..

पुण्यामधील घोले रस्ताला यांच्याच नाव देण्यात आले आहे.