रघुनाथ धोंडो कर्वे

श्री रघुनाथ धोंडो कर्वे

श्री रघुनाथ धोंडो कर्वे (जानेवारी १४, इ.स. १८८२ – ऑक्टोबर १४, इ.स. १९५३) हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते.

हे धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र होय.
र.धों.कर्वे यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात नोकरी केली, त्यातच त्यांनी कुटुंब नियोजन, लोकसंखेला आळा, याचे महत्त्व ते लोकांना सांगत राहिले.

तेव्हा महाविद्यालयाच्या रूढीवादी प्राचार्यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्यांनी तो दिला परंतु वरील प्रश्नांसाठी आपले आयुष्य समर्पित केले.
र धो कर्वे य जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणासंदर्भात स्त्रियांना व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता.

वैद्यकीय नवविध संशोधनाने कमी होत चाललेले मृत्यूचे प्रमाण व अनिर्बंध वाढत चाललेली लोकसंख्यामुळे संततिनियमनाची गरज लक्षता घेऊन रघुनाथराव कर्वे यांनी इ.स. १९२१ साली इंग्रजीत एक पुस्तक प्रकाशित केले. ह्या विषयावर संशोधन करून आपल्या राहत्या घरीच संततिनियमनाची साधने बनवून देण्याचा आधुनिक उपक्रम त्यांनी सुरू केला.
पत्नी मालतीलाही बरोबर घेऊन त्यांनी “कुटुंबनियोजन केंद्र स्थापन” केले. नागरिकांना मार्गदर्शन केले. लैंगिक रोगांची लक्षणे, कारणे त्यावरील उपाय यांबाबत लोकांना माहिती दिली. त्यासाठी त्यांनी ‘वेश्याव्यवसाय’, `आधुनिक आहारशास्त्र’ ही पुस्तके लिहिली.
इ.स. १९२३ साली पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी ‘संततिनियमन’ ह्या विषयावर भाषण केले. कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नातून पहिले कुटुंब नियोजन केंद्र इ.स. १९२१ साली लंडनमधे सुरू केले,त्याच वर्षी ते भारतात सुरू झाले. 

संततिनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेऊन र.धों. कर्वे यांनी १५ जुलै इ.स. १९२७ ला ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाची सुरुवात केली. 
या मासिकातील माहिती आक्षेपार्ह ठरवुन त्यांच्यावर खटले दाखल केले गेले. अश्या एका कोर्ट खटल्यांमध्ये त्यांना २०० रुपयेदंड झाला. एकदा त्यांची केस बाबासाहेब आंबेडकरांनी लढवली होती. त्यामुळे जरी ते ती केस हरले तरी त्यांना बाबासाहेबांसारखा आयुष्यभरासाठीचा मित्र मिळाला.

पुस्तके –
आधुनिक आहारशास्त्र.
आधुनिक कामशास्त्र.
त्वचेची निगा.
गुप्त रोगांपासून बचाव.
वेश्याव्यवसाय.
संततिनियमन.
संतति नियमन – विचार व आचार. इत्यादी.

ध्यासपर्व हा अमोल पालेकरांनी त्यांच्यावर काढलेला एक अत्युत्तम चित्रपट आहे.

र.धों. कर्वे यांच्या जीवनकार्यावर अजित दळवी यांनी समाजस्वास्थ्य नावाचे नाटक लिहिले असून, अतुल पेठे यांनी ते दिग्दर्शित केले आहे.

महात्मा गांधीचे ब्रम्हचर्य ,टागोरांच्या नोबल प्राप्त कविता ,आचार्य अत्रे यां व्यक्तींवर ही प्रसंगी र,धो.नी आपली परखड मते नोंदविली आहेत.