खुदिराम बोस Khudiram Bose

 

ज्या वयात तरुण पिढी भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असतात त्या वयात त्यांनी त्याचं पूर्ण आयुष्य देशासाठी पणाला लावलं. ते थोर क्रांतिकारक म्हणजे खुदीराम बोस. बोस यांचा जन्म ३ डिसेंबर १८८९साली बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील हबीबपूर गावात झाला. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मोठ्या बहिणीनं त्यांचा सांभाळ केला. बंगालची फाळणी झाल्यानंतर बोस यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. सत्येन बोस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्यांचं क्रांतिकारी जीवन सुरू केलं. नववीत असताना त्यांनी शाळा सोडली आणि त्यांचा पूर्ण वेळ देशासाठी दिला.

 

२८ फेब्रुवारी १९०६साली सोनार बंगला नावाचं एक जाहिरात पत्रक वाटत असताना बोस यांना पोलिसांनी पकडले. दरम्यान बोस यांनी हुशारीनं त्यांना चकमा देत तिथून पळ काढला. त्यानंतर १६ मे १९०६ रोजी पोलिसांनी त्यांना अटक केली पण अल्पवयीन असल्या कारणाने त्यांना समज देऊन त्यांना सोडण्यात. ६ डिसेंबर १९०७मध्ये बंगालमध्ये नारायणगड रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोटाच्या कटात बोस यांचा सहभाग होता.

 

किंग्सफोर्ड चीफ प्रेसिडेंसी मॅजिस्ट्रेट हे क्रुर अधिकारी म्हणून ओळखले जातं होते. फक्त क्रांतिकारकांना त्रास देणं हा त्यांच्या मुळं उद्देश होता. म्हणून क्रांतिकारकांनी त्यांची हत्या करण्याचा कट योजना आखली. युगांतर क्रांतिकारी दलाचे नेते वीरेंद्र कुमार यांनी किंग्सफोर्डच्या हत्येची कामगिरी खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चंद यांच्याकडं सोपवली.

 

प्रफुल्ल चंद आणि खुदीराम बोस दोघं किंग्सफोर्डला मारण्यासाठी बिहारला रवाना झाले. बिहारला पोहचल्यानंतर आठ दिवस त्यांनी किंग्सफोर्ड आणि त्यांच्या कुटुंबावर पाळत ठेवली. ३० एप्रिल १९०८ साली रात्री साडे आठच्या दरम्यान किंग्सफोर्डच्या बग्गीवर बॉम्ब हल्ला केला पण त्यांचा अंदाज चुकला आणि त्या हल्ल्यात किंग्सफर्डची पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला.

 

हल्ल्यात किग्सफोर्डचा मृत्यू झाला असं समजून दोघांनीही तिथून पळ काढला आणि पूसा रेल्वे स्थानकात पोहचले. रेल्वे स्थानकात पोहचल्यानंतर त्यांच्या हालचालीवरून पोलिसांना संशय आला आणि तिथेच त्यांना घेरण्यात आलं. आता आपल्याला अटक होणार हे जाणताच प्रफुल्ल चंद यांनी स्वतःवर गोळी झाडली तर खुदीराम बोस यांना पोलिसांनी अटक केली. बोस यांच्यावर हत्येचा खटला दाखल करण्यात आला. केवळ पाच दिवस चाललेल्या या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांनी ही त्यांचा गुन्हा कबुल करत फाशीची शिक्षा स्वीकारली.

 

टिळकांनी आपल्या केसरी या वृत्तपत्रात या खटल्याबाबत लिहित स्वराज्याची मागणी केली होती. या प्रकरणाची सुनावणी जस्टिस दिनशॉ डावप नावाचे एक न्यायाधीश करत होते आणि त्यावेळी टिळकांचे वकील मोहम्मद अली जिन्ना होते. या खटल्याशी निगडित लिखाणाने लोकमान्य टिळकांनी १९०८ ते १९१४ पर्यंत देशद्रोहाच्या आरोपाखाली मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगली.

 

फाशीच्या एक दिवस अगोदर जेलमध्ये घडलेला एक छोटेखानी प्रसंग या वीररत्नाची देशभक्ती किती अतिउच्च पराकोटीची होती हे दाखवून देतो. ११ ऑगस्ट १९०८ रोजी सकाळी ६ वाजता महान क्रांतिकारक खुदीराम बोस यांना फाशी देण्यात येणार होती. १० ऑगस्टच्या रात्री जेलर त्यांच्याकडे आला. जेलर खुदीरामजींची देशभक्ती पाहून आधीपासूनच त्यांच्या प्रेमात पडला होता.. तो त्यांच्याकडे ४ रसाळ आंबे घेऊन आला आणि म्हणाला, “खुदीरामजी, मी तुमच्यासाठी हे आंबे आणले आहेत.” आपण ते खाऊन घ्या. माझ्याकडून ही एक छोटी भेट म्हणून स्वीकारा. मी खूप समाधानी होईल. ”

 

खुदीरामजींनी ते आंबे घेतले आणि आपल्या कोठडीत ठेवत म्हणाले, “थोड्या वेळाने मी आंबे नक्कीच खाईन.”

 

सकाळी जेलर फाशीसाठी खुदीरामजींना घेण्यास आला. खुदीरामजी भगवतगीता हाती घेऊन आधीच तयार होते. जेलरने पाहिले की त्याने दिलेले आंबे तसेच ठेवलेले होते. त्याने विचारले, “खुदीरामजी आपण हे आंबे चोखले नाहीत का? तुम्ही माझ्या उपहाराचा स्वीकार केला नाहीत का?”

 

जेलर म्हणाला, “बरं, काही हरकत नाही, मी हे आंबे उचलतो आणि आता ही तुमची भेट समजून माझ्याकडे ठेवीन.” असे म्हणत जेलरने आंबे हातात घेताच पिचकले. खुदीराम मोठ्याने हसले आणि बराच काळ हसत राहिले. खुदीरामजींनी त्या रात्रीच आंब्यांचा रस चोखून सोडला होता.

 

खुदीरामजींच्या गंमतीने मुग्ध व आश्चर्यचकित झालेला जेलर आपल्या भावमुद्रा लपवून ठेवू शकला नाही. तो विचार करीत होता की, काही काळानंतर मृत्यूच्या भक्ष्यस्थानी जाणारा हा एक मुलगा मृत्यूकडे कसा काय दुर्लक्ष करू शकतो? मनोमनी जेलर उत्तरला की, “खरंतर ही मातृभूमी नररत्नांची खाण आहे आणि खुदीरामसारखे लोक या मातृभूमीने महान निस्वार्थ त्यागानं जन्माला घातली आहेत. अशी महापुरुष आपल्या मातृभूमीवर वारंवार परत येतील अशी इच्छा मी मनोमनी बाळगून आहे. ”

 

खुदीराम बोस यांच्या फाशीनंतर बंगालमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. बंगालमधील जुलाह भागात एक खास धोतर बनवण्यात आल