प्रागैतिहासिक कालखंड

अश्म युग

पुराणाश्म युग (Palaeolithic age) :

इ. स. पूर्व ९००० पर्यंतचा काळ मानवाचा मुख्य व्यवसाय शिकार करणे.

  • शिकार व इतर कामांसाठी दगडी हत्यारांचा वापर केला जात असल्याने पाषाण युग म्हटले गेले. हत्यारे तीक्ष्ण नव्हती.
  • शेतीचे ज्ञान नव्हते.
  • डोंगरपायथ्यालगत किंवा नदी काठावर वस्ती करत असे.
  • नैसर्गिक गुफांमध्ये राहत असे. उदा. भीमबेटका (मध्यप्रदेश).
  • भीमबेटका येथील गुहांमध्ये भिंतीवर चित्रे कोरली आहेत. त्यात मानवी जीवन तसेच शिकारीचे दृष्य दाखवली आहेत. पक्षी आणि प्राणी चित्रे यांचा समावेश,

मध्याश्मयुग (Mesolithic age)

इ.स.पूर्व ९००0 इ.स.पूर्व ४000 पाषाण युग आणि नवाश्म युग यांच्यामधील कालखंड, मुख्य व्यवसाय – शिकार, कंदमुळे गोळा करणे आणि मासेमारी, नंतर प्राणी पाळण्यास सुरुवात.

दगडी हत्यारांचाच वापर मात्र हत्यारे अधिक तीक्ष्ण बनली. दगडी हत्यारे चकत्यांसारखी झाली.

नवाश्म युग (Neolithic age)

इ. स. पूर्व ४०00 इ. स. पूर्व १५०0 या काळातील दगडी हत्यारे मध्याश्म युगापेक्षा अधिक तीक्ष्ण बनली.

  • हत्यारे बनवण्यासाठी चकाकी असलेल्या दगडांचा वापर करण्यात येत.
  • चकत्यासारखी दगडी हत्यारे वापरत नसे.
  • शेतीची सुरवात – रागी, कुलीथ, काही ठिकाणी गहू व तांदुळ यांचे शेतीत उत्पादन.
  • राहण्यासाठी दगड व मातीची चौकोनी आकाराचे घरे बनवत असे.
  • स्थायिक जीवन पद्धतीची सुरुवात.
  • मातीच्या भांड्यांच्या वापरास सुरुवात.
  • पाळीव प्राण्यांच्या संख्येत वाढ.

ताम्र पाषाण युग (Chalcolithic age)

नवाश्मयुगाच्या शेवटी धातुच्या वापरास सुरुवात.

  • सुरुवातीचे धातु तांबे हे होते.
  • या काळात तांबे व दगड या दोन्हींचा वापर होत असल्याने यास ताम्रपाषाण युग म्हटले गेले.
  • काही ठिकाणी ब्राँझचाही वापर.
  • ताम्रपाषाण संस्कृतीच्या महत्त्वाची ठिकाणी- अहर, कायथा, सावळदा, प्रभास, नागपूर शिकार ही करत आणि गाय, म्हैस, शेळी सारख्या प्राण्यांनाही पाळत असे. मात्र घोडा हा प्राणी त्यांना माहित नसावा.
  • गहु, तांदुळ, बाजरा, मसुर, कापुस इ. ची शेती करत.
  • कापड बनवण्याची कला अवगत होती.
  • मृत व्यक्तींना पुरण्याची पद्धत होती.
  • स्त्री देवतांची पुजा करत.
  • प्रागैतिहासिक मानवाला लेखन शैली अवगत नव्हती.