अवंतिकाबाई गोखले

महात्मा गांधींचे मराठीत आणि एकुणच पहिले चरित्र लिहणारी व्यक्ती.

गांधीजींची पहिली शिष्या. पती बबनराव आणि अवंतिकाबाई गांधीच्या अगदी सुरुवातीच्या काळापासुन सोबत होते चंपारण्य (१०० वर्ष) लढ्यामधे बापुंच्या बोलविण्या वरुन हे दांपत्य सहभागी झाले होते. चंपारण्याच्या सत्याग्रहामध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्राच्या सत्याग्रही तुकडीत आनंदी वैशंपायन व अवंतिकाबाई गोखले या दोन महिला होत्या. मुलींच्या शिक्षणाकरिता प्रचार केला. बडहरवा गावी मुलींची शाळा काढली.१९१९ मध्ये नाशिकमधल्या एका सभेत अवंतिकाबाईंचे भाषण ऐकून लोकमान्य टिळक प्रभावित झाले आणि ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची सरोजिनी आता तयार झाली आहे.’’

मुंबईतील मोटलबाई पटेल महाविद्यालयत नर्सिंग चे शिक्षण घेतलेल्या अवंतिकाबाई मुंबईतील लालबाग परिसरातील मिल कामगारांच्या साठी प्रभावीपणे काम करत असत हा वारसा त्यांना सेवासदन (अध्यक्ष ही)
मधे मिळाला होता.

याचा कामगारांच्या मुलांसाठी त्यांनी पहिले शिशुगृह (पाळणाघर) सुरु केले होते.

१९१८ मधे हिंद महिला समाज च्या माध्यामतुन त्यांनी गरिब मध्यमवर्गातील महिलांच्या उन्नतीसाठी काम केले.

यशोदाबाई भट यांच्यातील कीर्तनाचे अंग ओळखून त्यांच्याकडून चाळीचाळीत फिरून राष्ट्रीय कीर्तने घडवून आणली.

टिळक फंडासाठी (असहकार) ३९०० रुपयाची मोठी देणगी या समाजाच्या माध्यमातुन महिलांनी दिली होती.
(१६०० रुपये वैयक्तिक )

महिलांना एकत्रित करुन पुस्तके वाचण्याचा उपक्रम हि प्रसिध्द आहे.

व्याख्यान माले सारखे उपक्रमातुन महिलांची प्रगल्भता वाढविण्यासाठी प्रयत्न केले.

हिंद महिला’ नावाचे एक साप्ताहिक सुरू केले. फैजपूरच्या काँग्रेसला हिंद महिला समाजाच्या महिलांचा मोठा गट बाईंच्या नेतृत्वाखाली गेला. या अधिवेशनात खादी विक्रीची जबाबदारी बाईंनी उचलली .

विशेष म्हणजे बापुंची धोतरजोडी अवंतिकाबाई सुतकातुन तयार करुन भेट करत असत.

सविनय कायदेभंगात कमलादेवी चटोपाध्याय यांच्या सोबत मुंबई मधै मीठच्या सत्याग्रहात प्रमुख सहभागी होत्या.