Turmeric crop planning हळद पिकाचे नियोजन

* जमिनीची मशागत :-

 एप्रिल महिन्यात जमिनीची सखोल नांगरटी करुन जमिन ४० ते ४५ दिवस चांगल्या प्रकारे तापु द्यावी.

 बेड तयार करण्याअगोदर सिंगल सुपर फॉस्फेट -१ बॅग व फोरट -६ किलो मिश्रण करुन प्रति एकरी शिंपावे व पाळी करुन बेडतयार करावे.

दोन बेड मधील अंतर ४ फुट ठेवावे. व बेडचा आकार १.५ (दिड) फुटाचा रुंद व १० इंच उंचीचा बनवावा. प्रक्रिया केलेले शेणखत असल्यास बेडवर टाकून ठेवावे.

* बियाणे निवड :-

आपणास बंडा अथवा शेंग घ्यावयाची असल्यास बेणे निवड हा एक महत्त्वाचा भाग आहे. बुरशीयुक्त किंवा मागील वर्षी सड लागलेल्या शेतामधील बेणे मुळीच घेवु नये. शेंग घेतल्यास २ ते ५ इंचापर्यंतचे बेणे घ्यावे. बारीक बेणे निवडून बाजूला टाकावे.

* बियाणे प्रक्रिया :-

प्रति एकरी ८ क्विंटल बेणे पुरेशे आहे.

युमिक जेल-२५०ग्रॅम

क्लोरो ५०%-२५० मिली

व्ही.सी.ओ.सी.-२५० ग्रॅम

 या तीनही घटकांचे १०० लिटर द्रावण तयार करुन त्यातुन सर्व बेणे ढवळून काढावे. व हे द्रावण नंतर बेडवर शिंपुन द्यावे.

* लागवड :-

जुन महिन्यात लागवड करावी.

चांगल्या ठोकर शेंगा लागवडीस घ्याव्या व ठिंबकच्या दोन्ही बाजुने समांतर लागवड करावी.

कोळप्याने १ फुटांचे अंतर घेवुन बेड वर चरी पाडून घेतल्यास लागवड उत्तम प्रकारे करता येते.

दोन शेंगामधील उभे अंतर १० इंच व आडवे अंतर १२ इंच असावे. शेग किंवा बंडा टोकताना ३ इंच खोल टोकावा.

* पहिली आळवणी :-

(ड्रिप द्वारे द्रावण सोडणे) लागवडीपासुन सातव्या दिवशी प्रति एकरी

ह्युमिक जेल – १ किलो

व्ही.सी.ओ.सी.-५०० ग्रॅम

१९:१९:१९-२ किलो

या घटकाचे २०० लिटर पाणी तयार करुन ठिंबक द्वारे सोडावे.

ठिंबक नसल्यास पंपाचे नोझल काढून धार सोडावी.

* दुसरी आळवणी :-

 (ड्रिप) लागवडीपासुन १६ ते १८ दिवसात हे द्रावण सोडावे.

उर्जा- २ लिटर व त्रिकाल-१ लिटर प्रति एकरी सोडावे.

या नंतर ५ ते ६ दिवसांनी खताचा भेसळ डोस टाकावा.

* खताची पहिली मात्रा :-

लागवडीपासनु २२ ते २४ दिवसात खताची पहिली मात्रा टाकावी.

डी.ए.पी.-१बॅग

निंबोणी पेंड -२ बॅग

पोटॅश-२५ किलो

युरिया-२५ किलो

हायपॉवर – १० किलो

शक्ति गोल्ड – १० किलो

वरिल सर्व घटकांचे मिश्रण करुन बेड वर मधोमध टाकावे. त्यानंतर ठिंबक द्वारे पाणी सोडावे.

* पहिली फवारणी :-

 लागवडीपासुन ३० ते ३२ दिवसात पहिली फवारणी करावी. (जुन्या फवारणीमध्ये बदल केलेला आहे.)

ह्युमिक जेल-२५ ग्रॅम

चॅलेजर – ५ मिली

व्हि.ठोको.-२० ग्रॅम,

नीमहटंर – २० मिली.

या नंतर लगेच शेतकरी बांधवानी आपल्या शेतामध्ये हॅलोजन लाईट किंवा साधे लाईट लावावे.

हे लाईट २० जुलै पासुन तर २० सप्टेंबर पर्यंत रोजी रात्री चालु ठेवावे.

म्हणजे कंद माशीचा प्रादुर्भाव आपल्या हळद पिकावर होणार नाही.

एक मादी माशी किमान १४० अंडे देते व या अंडया तुन बाहेर पडलेल्या अळया पिकाच्या कंदाचे रस शोषून करतात व कंद पिळपिळे करतात व सड लागते म्हणून लाइट लावणे हे आवश्यक कार्य आहे.

* दुसरी फवारणी :-

 लागवडीपासुन ४५ ते ५० दिवसात दुसरी फवारणी करावी.

अॅमिनो जेल – २५ ग्रॅम

कॉम्बो-२५ ग्रॅम

जजमेंट-२० मिली,

माइट -२० मिली.

* खताची दुसरी मात्रा :-

 लागवडीपासुन ६० ते ६५ दिवसात खताची दुसरी मात्रा द्यावी.

२०:२०:०:१३-१ बैग

मग्नेशिअम-५ किलो,

बोरॉन- १.५ (दिड) किलो

सल्फर-३ किलो

झिंकोव्हिट-७५० ग्रॅम,

फेरोव्हिट-५०० ग्रॅम. (प्रति एकरी)

* तिसरी आळवणी :-

 (ड्रिप) भुमिसंजीवनी प्रति एकरी २ लिटर सोडावे. ७० ते ७५ दिवसांत हे द्रावण सोडल्यास ६ प्रकारचे जीवाणू

(बॅक्टोरिया) मिळतात व जमिन भुसभुसीत होण्यास मदत होते व त्यामुळेकंदाची वाढ चांगल्या प्रकार होते.

 * चौथी आळवणी :-

 ८० ते ९० दिवसाच्या दरम्यान ४ थी आळवणी करावी.

ह्युमिक जेल २ किलो १ लीटर

व्हाईटोन ब्लु कॉपर – ५०० ग्रॅम / व्ही.सी.ओ.सी. ५०० ग्रॅम

या नंतर १०० दिवसापासुन पुढे ४ महिन्यापर्यंत विद्राव्य खते आलटुन पालटून द्यावी लागतात. ही खते कशाप्रकारे द्यावयाची यांचा तक्ता खालीलप्रमाणे दिला आहे:

अ.क्र.खताचा प्रकारप्रमाणदिवस
१)१९:१९:१९८ किलो  ११० दिवस  
२)१२:६१:०  ८ किलो  १२० दिवस
३)१३:४०:१३  ८ किलो  १३० दिवस  
४)०:०:५०  ८ किलो  १४० दिवस  
५)१९:१९:१९  ८ किलो  १५० दिवस  
६)१२:६१:०  ८ किलो  १६० दिवस  
७)१३:४०:१३  ८ किलो  १७० दिवस  
८)०:०:५०८ किलो१८० दिवस  

या पध्दतीने सुरु ठेवावे.

* तिसरी फवारणी :- लागवडीपासुन १२० दिवसाला तिसरी फवारणी करावी.

झिंकोव्हिट-२५ ग्रॅम

फेरोव्हिट-२५ ग्रॅम

बोरॉन-३० ग्रॅम (प्रति १५ लिटर पंप हि फवारणी करावी.)

*हळद पिकावर येणारे रोग :

१) कंद व मुळकुज :- या रोगाची लागण पिथीअम अॅफनीडर मॅटम या बुरशी मुळे होते. झाडांची पाने व कडा वाळून पाने गळतात व झाडांचा बुंधा पांढरट दिसतो व नरम पडतो.

२) कंदकुज (गडेकुजव्या):- हुमणी किंवा कंद अळीने कंदाचा रस शोषुन घेतल्यास कंद पिळपिळा होतो.

         अशा वेळेस डेटांसू, डेसिस किंवा लिशेंटा-१०० ग्रॅम व नुवान -२५० मिली २०० लिटर पाणी करुन प्रति एकरी सोडल्यास हुमणी किंवा अळया जमिनीच्या वरती येवून मरतील.

३) पानावरील ठिंबके

४) कोरडी मर

५) पानावरील रस शोषून घेणारा ढेकुन –

६) सुत्र कृमि वरील सर्व रोगांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न या तंत्रात केलेला आहे.

* टिप :- प्रत्येक फवारणीस स्टीकर वापरणे बंधनकारक आहे.