विल्यम कॕरे William Carey marathi

विल्यम कॕरे

 

ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना त्या काळी मराठी व हिंदुस्थानी भाषा सक्तीने शिकाव्या लागत, एवढेच नव्हे तर त्या भाषांच्या परीक्षाही द्याव्या लागत.

 

वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्यामदतीने मराठीचा अभ्यास केलाला विल्यम कॕरी”

श्रीरामपूर (सेरमपूर) येथे आल्यावर कॕरी ने १० जानेवारी १८०० मध्ये बॅष्टिस्ट मिशन’ चे केंद्र तेथे स्थापन केले आणि इथुनच मराठी व बंगाली गद्य,मुद्रणाला कलाटणी मिळाली.

 

श्रीरामपूर येथे जम बसताच कॅरीने तेथे एक चर्च, शाळा व छापखाना उभारला आणि आपल्या सहकांऱ्याच्या मदतीने धर्मप्रसारास प्रारंभ केला. या सुमारासच ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली (४ मे १८००). एप्रिल १८०१ मध्ये कॅरीची या कॉलेजात संस्कृत, बंगाली व मराठीचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. मृत्युंजय विद्यालंकार, रामराम बसू व वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्या मदतीने कॅरीने आधुनिक बंगाली गद्याचा व मराठी गद्याचा तसेच ह्या भांषातील मुद्रणव्यवसायाचा पाया घातला.

 

कॅरी व त्याच्या सहकाऱ्यांनी बायबलचा सर्व हिंदूस्थानी भाषांत व प्रमुख बोलीत अनुवाद करण्याचे योजिले होते आणि त्यासाठी छापखाना सुरु केला होता.कॅरीने स्थापन केलेला छापखाना पुढे श्रीरामपूर मिशन प्रेस’ म्हणून ओळखला जाऊ लागला. बायबलचे चाळीस हिंदूस्थानी भाषा – बोलींतील अनुवाद याच छापखान्यात छापून प्रसिद्ध झाले. तसेच बंगाल गॅझेट, दिग्दर्शन व समाचार दर्पण ही नियतकालिकेही तेथूनच प्रसिद्ध होत असत. बंगाली नियतकालिक प्रकाशनाचा आरंभ तेथेच झाला.

 

कॅरीने ग्रामर ऑफ मराठा (मराठीचे व्याकरण) लॅंग्वेज (१८०५)व डिक्शनरी ऑफ मराठा लॅंग्वेज (१८१०)हे ग्रंथ तयार करुन प्रसिद्ध केले.

 

“मराठीतील हे पहिले मुद्रित गद्यपुस्तक होय. “

 

यापुढील सोळा वर्षांत त्याने बायबलचा जुना व नवा करार मराठीत भागशः प्रसिद्ध केला. यांशिवाय त्याने “वैजनाथशास्त्री कानफाडे” यांच्याकडून मूळ बंगालीवरून सिंहासन बत्तिशी (१८१४),हितोपदेश (१८१५) आणि प्रतापदित्य चरित्र (१८१६) हे तीन मराठी अनुवाद करून घेतले. महाराष्ट्रात ग्रंथप्रकाशनाचा आरंभ १८२२ मध्ये पंचोपाख्यान ग्रंथाने झाला असला, तरी त्यापूर्वी बंगालमध्ये झालेली मराठी ग्रंथनिर्मिती लक्षात घेता, मराठी ग्रंथमुद्रणाच्या आणि प्रकाशनाच्या आद्यप्रर्वतनाचे श्रेय विल्यम कॅरीकडेच जाते.