मदनलाल धिंग्रा ..
- भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक थोर हुतात्मा.
- त्यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते.
- मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाबविद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले.
- तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्यांचा विवाह झाला.
- इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला.
- तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला.
- ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले.
- त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोसव कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला.
- सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण त्यांनी घेतले. पुढे त्यांनी भारतमंत्र्याचा स्वीय साहाय्य्क कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला.
- त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाउसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला.
- दोघेही मरण पावले. मदनलाल यांना अटक होऊन फाशीची शिक्षा देण्यात आली.
- पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्घोषात फाशी गेले.